पातूर तालुक्यातील अंबाशी गावात कौटुंबिक वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान घडली. अकोल्याच्या कानशिवनी येथील अंदाजे 40 वर्षीय नागेश पायरुजी गोपनारायण हा सासरवाडीतील अंबाशी येथे सासरवाडीत आला असताना घरगुती वाद विकोपाला गेला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि नागेश याच्यावर चाकू व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. यामधील सिद्धार्थ चोटमल, रेखा चोटमल आणि नंदा डोंगरे या तिघांना पातूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे.