शहरातील अक्कलकोट रोड येथे SVCS शाळेसमोर वाहतूक पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी विशेष कारवाई केली.शालेय विद्यार्थ्यांनी फुल्ल भरलेल्या रिक्षांमुळे नेहमीच अपघाताचा धोका वाढतो याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अचानक धडक कारवाईदरम्यान अतिरिक्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अनेक रिक्षा ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या.