गावाला जगाशी जोडणार्या रस्त्यांची दुर्दशा असेल तर नागरिकांचे जगणे अतिशय अवघड होते. चिखली मतदारसंघातील सोमठाणा येथील नागरिकांनाही दर वर्षी पावसाळ्यात असाच त्रास होतो. ओढे, नाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्कच तुटतो आणि लोकांचे खूप हाल होत होते. हा प्रश्न आमदार श्वेता महाले यांनी लक्षात घेऊन मौजे सोमठाणा येथील या पुलासाठी पाठपुरावा करून भरघोस निधी खेचून आणला आणि 1 कोटी 77 लक्ष रुपयांच्या या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.