पारोळा --दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी झालेल्या अति वृष्टी मुळें बाधित शेळावे खु, बु येथील नुकसान ग्रस्त भागाची आमदार अनिल पाटील यानी आज 22 आगस्ट रोजी पहाणी केली.. यावेळी त्यांनी पुराचे पाणी शिरलेल्या वस्तीतील घरांची व नदीकाठाची पाहणी करून बाधित कुटुंब यांचेशी संवाद साधून माहिती घेतली व लवकरच मदत दिली जाईल याबाबत आश्वास्त केले...शेळावे येथील पाहणी नंतर मौजे चिखलोड येथील बाधित कुटुंब याना भेट देऊन माहिती घेतली.