मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर कणकवली उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जात होता. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हळवल फाटा येथील तीव्र वळणावर तो पलटी झाला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. तत्काळ तेथील नागरिकांनी ट्रेलर चालकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आज मंगळवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.