राहत्या घरी असलेल्या किराणा दुकानातूनच दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोळ्यानिमित्त गस्त घालताना घाटंजी पोलिसांनी कुऱ्हाड येथे 22 ऑगस्टला केली.उमेश जयस्वाल असे ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे दारू विकण्याचा कुठलाही परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध घाटंजी पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.