औसा -दि. 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सर्व गणेश भक्तांच्या अथक प्रयत्नातून औसा शहर व तालुक्यामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्तीची विधी व स्थापना केली होती तब्बल दहा ते अकरा दिवस विविध गणेश मंडळांनी धार्मिक व समाज प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्व रोग निदान शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भजन कीर्तन आशा विविध कार्यक्रमाची रेलचेल उत्सव काळात सुरू होती.