बीड शहर मधील पिंगळे गल्लीतील रहिवासी धनराज गुरखुदे हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह छ.संभाजीनगर येथे गेले होते. त्या काळात घराला कुलूप लावून ते बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने घराची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील सोने-चांदीसह मौल्यवान वस्तू चोरी केल्या.तपासादरम्यान तांत्रीक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित हा स्थानिक रहिवाशी शिवा नंदलाल गुरखुदे असल्याचे उघड झाले. चोरीनंतर बीड शहरातून गायब झाला होता. त्याला पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतले.