भाडळी बुद्रुक ता. फलटण येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी संस्थापक मोहनराव डांगे यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र माने यांची निवड बिनविरोध करण्यात आली. सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता चेअरमन मोहनराव डांगे यांनी माहिती दिली. भाडळी बुद्रुक येथील मातोश्री सोसायटी संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध झालेवर संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी करण्यात आल्या.निवडणूक निर्णय अधिकारी एस. टी. गरुडकर यांनी काम पाहिले.