कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर नजीकच्या येळाने येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरच्या कंदलगाव येथे राहणारा साहिल मेहबूब आंबी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज सोमवार दिनांक सात जुलै दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडली.