केंद्र सरकारने जनसुरक्षा कायदा संमत केला आहे.हा कायदा घटनाविरोधी आणि संविधानाच्या विरोधात जाऊन संमत केल्याची भावना विरोधी पक्षांची आहे.या कायद्याला विरोध करण्यासाठी कर्जत तालुक्यात या कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. कर्जत तालुक्यात आदिवासी आणि दिनदूबळ्या लोकांसाठी काम करणाऱ्या जागृत कष्टकरी संघटना यांनी जनसुरक्षा कायद्याचा विरोधात आंदोलन पुकारले होते.