उपनगर भागातील शिवाजीनगर येथे विद्युत मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी एकावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीधर जयवंत गायकवाड राहणार सनी प्लाझा बिल्डिंग, शिवाजीनगर पंचशील नगर उपनगर हे त्यांच्या फ्लॅटमधील विद्युत विभागाच्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करत असल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी सहाय्यक अभियंता महावितरण मंगेश रामचंद्र नागरे यांनी गायकवाड यांच्या विद्युत मीटरची पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.