उदगीर ग्रामीण पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली आहे याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, २४ ऑगस्ट रोजी रात्री बिदर कडून उदगीरकडे येणारी कार क्रमांक एम एच १३ बीएन ०९१२ या कारला ग्रामीण पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अडवुन कारची झडती घेतली असता कार मध्ये गुटखा आढळून आला ५ लाख ६१ हजार ६६० रुपयांचा गुटखा व ७ लाखांची कार पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला