पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळनष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दि. २४ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन स्तरावर जुगार अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता १६ आरोपींच्या ताब्यातून कोंबडे, मोटरसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत १ लाख ७१ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.