बागलाणच्या नामपूर येथे शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव गडगडल्याने केला रास्ता रोको Anc: बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काल दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक रस्तारोको आंदोलन छेडले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती.