कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत तु विरोधात अर्ज का दाखल केला असे म्हणत निवडणुकीच्या निकालानंतर कृऊबा कार्यालयासमोर आपल्याला शिवीगाळ करीत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मारहाण केल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष तथा कृऊबाचे संचालक ज्ञानेश्वर डुकरे यांनी भद्रावती पोलीसात दाखल केल्यानंतर पोलीसांनी शिंदे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.