आज शनिवारी शनि अमावस्या असल्याने बीड शहरातील प्राचीन व ऐतिहासिक शनी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. शनिदेवाचे विशेष पूजन, अभिषेक व दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील गावोगावातून भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले. दर शनिवारी मंदिरात भक्तांची मोठी वर्दळ असतेच, मात्र शनि अमावस्या हा विशेष दिवस असल्याने आज भक्तांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. सकाळी पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘जय शनिदेव’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.