चिखलगावजवळ भीषण अपघात, ट्रक उलटला- चालकाचा मृत्यू अकोला-पातूर महामार्गावरील चिखलगावजवळ आज दुपारी एक भीषण अपघात घडला. अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो उलटला. या अपघातात ट्रक चालक साजिद खान रुसून खान याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.