ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराई मध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी तुफान दगडफेक केली यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज करत या कार्यकर्त्यांना पांगवले. यामुळे काही काळ गेवराई मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रा लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या विषयी दोन दिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते.