आगामी गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद व दुर्गा उत्सव पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान दिग्रस येथे जातीय दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली. ही तालीम उपविभागीय अधिकारी दारव्हा डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रसच्या आर्णी बायपास येथे पार पडली. पोलीस स्टेशन दिग्रस येथून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 6 अधिकारी, 46 पोलीस अमलदार व 45 होमगार्ड सहभागी झाले.