तिंत्रव येथून एका घरामधून विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोहेकॉ निलेश हिवाळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकासह तिंत्रव येथील मंगेश गुलाबराव भोजने वय 42 वर्ष याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता त्याचे घरातून 1 तलवार किंमत 2 हजार रुपये ची मिळुन आली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.