परळी तालुक्यातील कवडगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लिंगी नदीच्या पुलावरून जात असताना एका तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज कदम असे या तरुणाचे नाव असून, ते सोनपेठवरून आपल्या गावी परतत होते. मात्र नदीला आलेल्या पूरस्थितीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले आहे.