दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत काल दुपारी २: १३ मिनिटांनी दर्यापूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली. फिर्यादी ३४ वर्षीय महिला व आरोपी मंगेश एकनाथ ठाकरे वय ३५ वर्ष हे एकमेकांचे नातेवाईक असून आरोपीजवळ फिर्यादिची मोबाईल चॅटिंग, आणि ती चॅटिंग नवऱ्याला दाखवण्याची धमकी देऊन आरोपीने २०२३ पासून ते २०२५ आजपर्यंत महिलेचा शारिरीक छळ केला.