जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने आज दिनांक 29 ऑगस्ट वार शुक्रवारी रोजी एक वाजता ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. हिंगोली येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. जन प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.