चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेने चार जनाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी 17 वर्षे 10 महिने हिला जुन्या वादाच्या कारणावरून अजय टेंबरे, श्याम मोहोळ, संतोष, उज्वल वाघमारे राहणार रायपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती यांनी पळवून नेल्याच्या संशयावरून सदर महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. चांदुर रेल्वे पोलिसांनी चार जना विरुद्ध विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.