यावल येथील नगरपालिकेमध्ये आठवडे बाजार परिसरातील नागरिक आणि माजी नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबी हा मुस्लिम बांधवांचा सण आहे त्या निमित्ताने शहरातून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तेव्हा शुक्रवारचा आठवडे बाजार हा रद्द करून शनिवारी भरवण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. सदर निवेदन माजी नगरसेवक समीर खान, मनोहर सोनवणे,शफी शेख, अनिल जंजाळे सह आदींनी दिले आहे.