सोलापुरात गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला. सखल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. तुळजापूर रोड, होडगी रोड, अक्कलकोट रोड वरील ओढ्यांना पूर आल्याने रस्ते बंद होते. सोलापूर शहरात अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष करून विडी घरकुल परिसरात नागरिकांचे पावसामुळे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापुरात मुक्कामी होते.