तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गेली तीन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकरी श्रीकांत हरंगेकर यांच्या एक एकरावर तब्बल १५ लाख रुपये खर्च करुन लावलेली सफरचंदाच्या बाग भुईसपाट झालीय.सफरचंदाची बाग जोपासण्यासाठी वातावरण नसतानाही तीन वर्षे मेहनत करून रोपे जगवली अन् फळ आल्यानंतर अवकाळीने हिरावून नेलं त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत.मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांने दि.29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता केली आहे.