शहरातील ऐतिहासिक डोलारा तलाव पावसामुळे ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले.मात्र नगर परिषद व आपत्ती व्यवस्थापणाने याची दखल न घेतल्याने नागरीकांनी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी लागलीच परीसराची पाहणी केली व स्वखर्चाने डिझेल आणुन व पंप सुरु करुन तालावाची पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न केले यामुळे प्रभावित नागरिकांना दिलासा मिळाला. या नागरीकांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.