नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून राहुरी परिसरात आठवडाभरात ४ निरपराध नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळेच संतप्त झालेल्या कृती समितीने १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत कृती समितीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील दिले आहे.