काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या सुरक्षेसाठी रविवारी, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.15 वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे 60 सें.मी. उंचीने उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात एकूण 96.11 क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोटातून होणाऱ्या येव्याप्रमाणे विसर्गात बदल करण्यात येईल, अशी माहिती काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने जिल्हा माहिती कार्यालयाला दिली असून जिल्हा माहिती कार्यालयाने दुपारी 12 वाजता प्रसार माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे