बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात आज सोमवार रोजी मराठा समाजाने ठिय्या आंदोलनाचा भाग म्हणून रास्तारोको करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी त्याग करून कडक उपोषण सुरू केले असून त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर बीड तालुक्यातील अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५४८ डी) वरील मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावर लिंबागणेश