वारंगा फाटा ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामदेव धाब्यासमोर बोलेरो पिक अप वाहन क्रमांक एम एच 29 टी 66 83 हा आपल्या वाहनात अवैधरीत्या दोन जनावरे निर्दयपणे, वाहतुकीचा, जनावरांचा परवाना नसताना तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र नसताना घेऊन जात असताना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यास पकडून आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज सायं सूत्राकडून प्राप्त झाली आहे .