भिवंडी परिसराच्या नारपोली येथील एका कंपनीत भीषण आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. अचानक कंपनीमध्ये आग लागली आणि काही क्षणातच कंपनीचे दोन्ही मजले आगीच्या विळख्यात सापडले. अचानक आग लागली त्यामुळे आगीचे आणि धुराचे लोळ परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आणि सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर पहाटेच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही परंतु नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.