जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयेश भागवत चौधरी (वय ४५, रा. मोहाडी, ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.