यवतमाळ येथे दि. १३ सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र या कार्यक्रमावर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सकाळी १० वाजता टीका केली. जाधव यांनी सांगितले की, "शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री रामकथा ऐकण्यासाठी येतात, पण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मात्र वेळ देत नाहीत". यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.