गडचिरोलीत केवळ २५ नक्षलवादी शिल्लक आहेत. कोपर्शी चकमकीत अहेरी दलमची शेवटची सदस्य ठार झाली. चारही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.२७ आगस्टला गडचिरोली-छत्तीसगड सीमेलगतच्या कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांना एकूण चार जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. चकमकीनंतर गडचिरोली केवळ २५ नक्षलवादी शिल्लक असून अहेरी दलम जवळपास संपुष्टात आला आहे.