अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी गणेश घाट आणि ईद मिलादुन्नबी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.अकोल्यात काही दिवसांत गणेश विसर्जन उत्सव आणि त्यानंतर ईद मिलादुन्नबी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी मिरवणूक मार्ग आणि गणेश घाट दोन्हीची पाहणी केली.शहर कोतवाली, गणेश घाट, हरिहर पेठ, गणेश घाट तसेच ईद मिलादुन्नबी मिरवणूक मार्गावरील माणिक टॉकीज, सुभाष चौक, अकोट स्टँड, गवळीपुरा, तेलीपुरा चौक, ताजना पेठ, मोहम