धुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात आली आहे. साफसफाईसारख्या आरोग्यास घातक व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना केंद्र शासनाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ‘अस्वच्छ व्यवसायाचे प्रमाणपत्र’ आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी विलंबामुळे तब्बल १९८ शाळांमधील हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. तातडीने प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गुरु रविदासजी विचार मंचने आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना निवेदन देऊन केली आहे.