तालुक्यातील करंजी गावात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवर्गासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू केली. मात्र या योजनेंतर्गत गावात अद्याप घरकुलाचा लाभ मिळाला नाही. परिणामी स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही देखील गावात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील शेकडो लाभार्थी घरकुलच्या लाभापासून वंचित आहेत. ऊन, वारा, पाऊस, धारापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करत लाभार्थी संघर्षात जीवन जगत आहेत.