वीज चोरी शोध मोहिमेअंतर्गत महावितरणच्या खामगाव येथील पथकाने सजनपुरी येथे घरी छापा टाकून विद्युत मिटरची तपासणी केली असता मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहका विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान गुन्हा नोंदविला आहे.सजनपुरी येथे राहणारे बजरंग उत्तमराव निळे यांच्या घरी भरारी पथकाने छापा टाकून मीटरची तपासणी केली असता मागील १२ महिन्यात १७७८ युनिट ची वीज चोरी केल्याचे समजले.