इतवारी येथील कक्कड ज्वेलर्स मध्ये एक युवक सोन्याचे ब्रेसलेट घेण्याच्या बहाण्याने घुसला. त्याने ब्रासलेट पसंत केले आणि चार लाख 80 हजार रुपये किमतीचे 48 ग्राम चे दोन सोन्याचे ब्रासलेट हातात घातले आणि क्रेडिट कार्ड गाडीच्या डिक्की मध्ये राहिल्याचा बहाना बनवत आरोपी ब्रासलेट घेऊन फरार झाला. दुकानदाराने त्याचा दूरपर्यंत मागोवा घेतला परंतु आरोपी त्याच्या हाती लागला नाही.