औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या मार्गावर हुतात्मा स्मारकाजवळ हिंगोली कडे जाणाऱ्या भरधाव दुचाकी स्वाराने एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 12 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी साडे बारा वाजे दरम्यान घडली आहे. धुरपताबाई कचरू गायकवाड वय 70 वर्षे राहणार औंढा नागनाथ असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, वसीम पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने महिलेस औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले