Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

Akola, Akola | Aug 21, 2025
अकोला जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस व दूध दर, मराठा, धनगर व इतर आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे, तसेच अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. या सर्व ज्वलंत विषयांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us