एका बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या ८ जणांना शेगाव शहर पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेदरम्यान तीनपूतळे परीसर स्मशानभुमीच्या पाठीमागे पकडले.व त्याच्या ताब्यातून ५७६० रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पो.ना निलेश गाडगे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीनपूतळे परीसर स्मशानभुमीच्या पाठीमागे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ जणांना पकडले.