मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणासह समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न या मुद्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात यावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने आ. अर्जुनराव खोतकर यांच्याकडे शुक्रवार दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, कोषाध्यक्ष अशोक पडूळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, इंजि. शुभम टेकाळे, मंगेश मोरे,श्रीधर पोथरे, बाबा राऊत,विशाल कोरडे, आकाश जगताप यांनी निवेदन दिले.