रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते आहेत. रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिककामगार क्षेत्रात काम करत आहेत.