आज दिनांक 24 ऑगस्टला दुपारी दोन वाजताचे दरम्यान, शिंभोरा बेलोरा मार्गावरील शिंभोरा वळन रस्त्यावर, दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून, महेश देविदास चरपे वय 27 वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळते. मोर्शी येथे शेती साहित्य विकत घेण्याकरिता आला असतांना आपली कामे आटोपून परत बेलोरा येथे जात असताना शिंभोरा वळण रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक लागून हा अपघात झाला. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे