अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज ७ सप्टेंबर सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याबाबत नॅशनल सिशनोलॉजीकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळावर सदर भूकंपाचे धक्के जाणवल्याबाबत तपासणी केली असता भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही नोंद आढळून आली नाही. जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क असून तहसीलदार, तिवसा व महसूल विभागाचे पथक शिरजगाव मोझरी या गावांमध्ये जाऊन नुकसानीबाबत पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचे जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे आढळून आले नाही...