नांदेड शहरातील महाविरनगर येथे फिर्यादी रूपेशसिंग चौहान यांचे राहते घरी दि १ मे २०२० ते दि १२ सप्टेंबर २०२५ दुपारी तीन दरम्यान यातील आरोपी करणसिंग गाडीवाले याने यातील फिर्यादीस ८० हजार रुपये चोवीस महिन्याकरिता १३ टक्के दराने दिले होते. आजपावेतो फिर्यादीने आरोपीस ३ लाख ५० हजार रूपये परत केले अजुन २ लाख रुपये देणे आहे असे म्हणून पैशाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.